IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
img
Dipali Ghadwaje
जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय. 1,200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे आणि फसवणूक केल्याचं सांगितले जात आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट), ४६६ (बनावट), ४७४ (बनावट दस्तऐवजाचा वापर) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत आरोप ठेवले आहेत. जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेशी संबंधित २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासादरम्यान नवटके यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पुणे पोलिसांचा तपास आणि सीआयडी अहवाल सीआयडीच्या अहवालानुसार पुणे पोलिसांनी भाग्यश्री नवटकेविरुद्ध ऑगस्टमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. या अहवालामुळे घोटाळ्याच्या तपासातील गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी समोर आल्या. महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

२०२१ -२२ मध्ये भाग्यश्री नवटके पुणे जिल्ह्यातील विशेष तपास पथकाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्या भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीशी संबंधित घोटाळ्यांचा तपास करत होत्या.

सीआयडीच्या तपासात नवटके याच्यावर एकाच दिवशी एकाच गुन्ह्यांतर्गत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यांच्या अनुपस्थितीत तक्रारदारांच्या सह्याही घेतल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. या गैरप्रकारांच्या आधारे महाराष्ट्राच्या गृहविभागाने पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

काय आहे १२०० कोटींचा BHR घोटाळा?

हा घोटाळा २०१५शी संबंधित आहे, यात मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देण्याचे आश्वासन देऊन अनेकांना फसवले गेले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे याला पुणे शहर पोलिसांनी जून २०२१ मध्ये अटक केली होती आणि घोटाळ्याचा तपास अजूनही सुरू आहे. घोटाळ्याशी संबंधित तपास २०२० मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. यानंतर केंद्रीय तपास एजन्सीने १२ बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीस्थित कंपनीच्या संचालकांविरुद्ध भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 
scam | CBI | IPS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group