पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ;  सव्वाचार लाखांची  ऑनलाईन फसवणूक
पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ; सव्वाचार लाखांची ऑनलाईन फसवणूक
img
Dipali Ghadwaje

नाशिक (प्रतिनिधी) :- पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने माहिती मिळवून इन्स्टंट पर्सनल लोन मंजूर करून सव्वाचार लाख रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यांवर वर्ग करून एका इसमाची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुकेश रमेशचंद्र सोनवणे (वय 41, रा. विश्वज्योती अपार्टमेंट, गोविंदनगर, नाशिक) यांना दि. 5 ऑगस्ट रोजी ते घरी असताना दिलीप रंजन नामक व्यक्तीचा फोन आला. ॲक्सिस बँकेच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून दिलीप रंजन याने फिर्यादी सोनवणे यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यास पॅनकार्ड अपडेट करण्याचा बहाणा केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये ॲक्सिस डॉट एपीके हे बनावट मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले. 

त्याद्वारे सोनवणे यांच्या ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डावर 4 लाख 18 हजार रुपयांचे इन्स्टंट पर्सनल लोन मंजूर करून घेतले. त्यानंतर या कर्जापैकी 4 लाख 15 हजार 985 रुपयांची रक्कम फिर्यादी सोनवणे यांच्या ॲक्सिस बँकेच्या सेव्हिंग खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने इतर बँक खात्यांवर परस्पर वर्ग करून आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित दिलीप रंजन नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group