उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील हॉटेल ब्लू सीमध्ये काल पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली.
याचा जल्लोष दोन्ही पक्षांमध्ये सुरू असताना ठाकरे गटाला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. 2 माजी महापौर आणि स्थायीचे माजी सभापती भाजपाच्या गळाला लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
सकाळी 11 वाजता तिघे नेते व त्यांचे कार्यकर्ते गाडगे महाराज पुतळा येथे जमणार असून नंतर मिरवणुकीने जल्लोषात ते भाजप कार्यालयात जाऊन तेथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे हे आज सकाळी भाजपात प्रवेश करणार आहेत. शाहू खैरे यांच्या प्रवेशाने नाशिक मध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक आता उरलेला नाही.