आता माघार नाही ! लाल वादळाची मुंबईकडे कूच, कसारा घाट ओलांडला ; मागण्या नेमक्या काय ?
आता माघार नाही ! लाल वादळाची मुंबईकडे कूच, कसारा घाट ओलांडला ; मागण्या नेमक्या काय ?
img
वैष्णवी सांगळे
नाशिकपासून सुरू झालेल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने पुन्हा एकदा सरकारकडे प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नदीजोड प्रकल्प पूर्ण करावा, अनेक पिढ्यांपासून वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींना अद्याप कायदेशीर मालकी हक्क मिळालेले नाहीत ते मिळावेत, वनजमीन व गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतंत्र सातबारा उतारा देण्यात यावा, पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून ते स्थानिक आदिवासी भागांमध्ये आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण थांबवावे आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या काही प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. 

आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि अखिल भारतीय किसान सभा करत आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी येत आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला किसान सभेच्या विराट मोर्चाने कसारा घाट ओलांडला आहे. लवकरच हे किसान सभेचे ‘लाल वादळ’ ठाण्यात पोहोचणार असून,०३ फेब्रुवारीला मुंबईत दाखल होणार आहे. 

या मोर्चाची सुरुवात दिंडोरी तालुक्यातून झाली असून, यात दिंडोरीसह सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यांसारख्या आदिवासीबहुल भागांतून हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. आज (मंगळवारी) राज्य सरकारतर्फे मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी माकपचे एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group