नाशिकच्या कांदा व्यापार्‍याची सव्वापाच लाख रुपयांची फसवणूक
नाशिकच्या कांदा व्यापार्‍याची सव्वापाच लाख रुपयांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कांद्याची उर्वरित 5 लाख 27 हजार रुपयांची रक्कम न देता कर्नाटकच्या कंपनीमालकाने नाशिकच्या व्यापार्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विकास जगन्नाथ (रा. लवकुश अपार्टमेंट, महात्मानगर, नाशिक) हे व्यापारी असून, त्यांची पंचवटीतील भाजी मार्केटमध्ये अ‍ॅग्रो किम एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. दि. 11 जून 2025 रोजी फिर्यादी नवले यांनी बेंगळुरू येथील आरोपी अर्जुन बालाजी यांच्या एकम अल्ट्रा फार्म्स कंपनीला पंचवटी येथील भाजी मार्केटमध्ये असलेल्या अ‍ॅग्रो किंग एंटरप्रायजेसतर्फे 30 हजार 410 किलो कांदा 26.65 प्रतिकिलो दराने पाठविला होता.

या कांदा विक्रीपोटी उर्वरित असलेली 5 लाख 27 हजार 966 रुपयांची रोकड वारंवार संपर्क साधूनही आरोपी अर्जुन बालाजी यांनी फिर्यादी यांना दिली नाही. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बेंगळुरू येथील एकम अल्ट्रा फार्म्स कंपनीचे मालक अर्जुन बालाजी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group