Nashik : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात
Nashik : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात "या" दोघांना अटक
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी अमोल रमेश कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याचा शोध घेऊन त्यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच, आरोपी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर यास न्यायालयाकडून प्राप्त ट्रान्सफर वॉरंटच्या आधारे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

दोन्ही आरोपींना आज (दि. २३) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिकरोड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान बनावट कागदपत्रे व फसवणुकीशी संबंधित रक्कम हस्तगत करणे, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेणे, तसेच गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळविणे आवश्यक असल्याने दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती तपासी अधिकारी आणि सरकारी अभियोक्ता यांनी न्यायालयाकडे केली.
तपासाची आवश्यकता विचारात घेऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना दि. २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, शालार्थ आयडी प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रांची निर्मिती व वापर, तसेच या प्रकरणात इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग याबाबत तपास करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group