राजकीय वर्तुळात खळबळ !  राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २ नगरसेवकांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल ;नक्की काय घडलं?
राजकीय वर्तुळात खळबळ ! राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २ नगरसेवकांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल ;नक्की काय घडलं?
img
Nandini khandare More
राजकरणात सध्या अनेक क्कदायक घटना घडत असून आता पुणे शहराच्या राजकीय वर्तुळातुन एक मोठी आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या दोन विद्यमान नगरसेवकांसह १० ते ११ जणांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षातील दोन नगरसेवकांसह अकरा जणांवर अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अभ्यासिका आणि ग्रंथालयात अनधिकृतपणे प्रवेश करून तोडफोड करणे, साहित्याचे नुकसान करणे, चोरी करणे आणि विचारणा करायला गेलेल्या फिर्यादीला सर्वांसमक्ष जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा गंभीर आरोप या नेत्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे दोन नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये नगरसेवक सुरज लोखंडे आणि नगरसेविका प्रिया गदादे पाटील यांचा समावेश आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या एका अभ्यासिका आणि ग्रंथालयामध्ये हे प्रकरण घडले. आरोपानुसार, संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महानगरपालिकेच्या या अभ्यासिका व ग्रंथालयात अनधिकृत प्रवेश केला.
यावेळी त्यांनी आतमध्ये मोठी तोडफोड करत अभ्यासिका आणि ग्रंथालयाचे मोठे आर्थिक नुकसान केले. तसेच तिथून साहित्य चोरी केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जेव्हा या घडलेल्या प्रकाराचा आणि तोडफोडीचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तिथे गेले, तेव्हा आरोपींनी त्यांना सर्वांसमक्ष जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पर्वती पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अनधिकृत प्रवेश आणि जातीवाचक शिवीगाळ करणे, अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पर्वती पोलिसांकडून केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group