गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला मोठी गळती लागले असून आता पर्यंत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला असून ठाकरे गटाला अनेक मोठं मोठे हादरे बसले आहेत.दरम्यान आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकारणात मोठा डाव टाकत उद्धव ठाकरेंचा बड्या नेत्याला फोडलाय. शिंदेंनी थेट ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतलाय. आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दुबे यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलाय. दुबे यांच्या पक्ष प्रवेशावेळी राहुल कनाल देखील उपस्थित होते. हाती आलेल्या माहितीनुसार दुबे यांना शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दुबे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशात अराजकता पसरवत आहेत. परंतु आमच्यासाठी देश प्रथम आहे. इंडिया आघाडीची सत्ता नसल्यानं ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर सुप्रीम कोर्टावर दबाव आणत असल्याचा आरोप शिंदेंनी केलाय.
दरम्यान आनंद दुबे यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. राजीनामा देताना दुबे यांनी पक्षाच्या कारभारावर नाराजी वर्तुवली होती. एका वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दुबे यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगितलं होतं. आपल्याला कोणत्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पार्टी लाइन दर्शवता येत नाहीये. पक्षानं आपला मार्ग बदललाय. ठाकरे गटासोबत काम करताना आपण खूप प्रामाणिकपणे काम केलं. परंतु आता पक्षाने भूमिका बदलल्याचं दिसतंय. त्यावेळी दुबे यांनी सीजेपीच्या आंदोलनावरून पक्षाच्या कारभारावर टीका केली होती.