श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत उपस्थितांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्याबाबत मोठं विधान केले.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले. लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकते असं वारंवार विरोधकांकडून बोललं जात आहे. यावरच बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की, 'कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.' एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला.
रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! ''या'' दिवशी खात्यात पैसे जमा होणार
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, 'आमच्या मागे ही ताकद होती म्हणून आम्ही आज सरकारमध्ये आहोत. आमचे सरकार शेतकरी, कष्टकरी यांच्या माध्यमातून काम करत आहे. शेतकरी कर्जमाफी केली. ३६५ दिवस दिवसा ८ तास वीज देत आहोत.'