महाज्योती परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी ! लॉग-इन होईना, कंप्यूटर  बंद, विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
महाज्योती परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी ! लॉग-इन होईना, कंप्यूटर बंद, विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
img
Nandini khandare More

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील एका परीक्षा केंद्रावर महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुणे येथील आंबेगाव भागातील एका परीक्षा केंद्रावर संगणक बंद पडणे आणि लॉग-इन न होणे अशा गंभीर समस्या उद्भवल्याने अखेर ही परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, त्यांनी परीक्षा व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी केंद्रावर पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याचा दावा केला आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारी परीक्षा दुपारी ११ वाजेपर्यंतही सुरू होऊ शकली नाही, कारण अनेक विद्यार्थिनींना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही गरिबाच्या पोरी आहोत, शिष्यवृत्तीसाठी आलो आहोत,” अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या वाढत्या गोंधळानंतर अखेर या केंद्रावरील सर्व शिफ्ट रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनींना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, कारण अनेक जणी दूरवरून प्रवास करून परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. महाज्योतीच्या या पेपरमध्ये घोळ झाल्याचा दावा रोहित पवार यांनीही केला आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group