मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील कुर्लामध्ये असलेल्या फिनिक्स मॉलजवळ असलेल्या मुंबई महापालिकेच्या एका उद्यानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जोडप्याला बेल्ट, दगड, काठीने मारहाण करण्यात आली. एका तरुण जोडप्याला मारहाण करणारे मुले अल्पवयीन असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी अल्पवयीन आहे, त्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे, असे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.
समोर आलेल्या माहितीनुसार, एक तरुण आणि तरुणी उद्यानात फोटो काढत असताना ८ ते १० अल्पवयीन मुलांनी त्यांची छेड काढली. या वादातून या तरुण-तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्या, काठी अन् पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. शुक्रवार दुपारची ही घटना असून या तरुण तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसानी गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा व्हिडिओ काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून समाज माध्यमात तो प्रचंड व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. घाटकोपर पोलिसांनी तक्रार दाखल होताच ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या मुलांच्या पालकांना नोटीस पाठवली आहे.
जोडप्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ