मुख्यमंत्री कार्यालयाचा आदेश अन् मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तत्कालीन  पीएचं अखेर निलंबन !  काय आहे प्रकरण ?
मुख्यमंत्री कार्यालयाचा आदेश अन् मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तत्कालीन पीएचं अखेर निलंबन ! काय आहे प्रकरण ?
img
Nandini khandare More
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना दिल्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालयात साहाय्यक आयुक्त असलेल्या गाडे यांच्या निलंबनाचे आदेश पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी जारी केले. झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे हे पशु व दुग्ध विकास खात्याचे अधिकारी आहेत. त्या खात्यातून उसनवारी तत्वावर अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये त्यांना घेण्यात आले होते. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सदर प्रकरण फेब्रुवारी २०२४ मध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या तक्रारीशी संबंधित आहे. औषधांच्या रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याच्या बाटल्या व ओआरएस पाकिटे आढळल्याच्या कारणावरून एका मेडिकल स्टोअरचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात मेडिकल चालकाने ७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले होते. १३ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी बोलावल्यानंतर गाडे यांच्या केबिनमध्ये राजेंद्र धेरांगे नावाच्या कारकुनाने १ लाख १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यापैकी २ हजार रुपये ऑनलाइन आणि ५३ हजार रुपये रोख दिल्याचे तक्रारीत नमूद होते. या स्टिंग ऑपरेशननंतर गाडे यांना प्रतिनियुक्तीवरून कार्यमुक्त करून मूळ विभागात पाठवण्यात आले होते.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group