राज्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी राजकारण तापलेले असताना पुण्यासह मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत. सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. हा बडा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर आहे
मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून श्रीवर्धनमध्ये शिंदे सेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यातच दर्शन विचारे यांनी तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.