विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत. एका जागेच्या मागणीवरून शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तीन जागांवरील पराभवानंतर भाजपच्या नेत्याने आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमकं एका जागेवरून काय घडलं? भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य का केलं आणि या विधानामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होणार का? जाणून घ्या सविस्तर.
विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. . महायुतीमधला विसंवाद पहिल्यांदाचा अशा जाहीरपणे समोर आलेला आहे. पाच पैकी तीन जागा महायुतीने गमावल्या आहेत. यात दोन ठिकाणी भाजपला आणि एका ठिकाण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. भाजपने या पराभवासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर केलेली पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
या निमित्ताने भाजपच्या मनातली खदखद, अस्वस्थता बाहेर आली आहे. शिक्षकच्या दोन आणि पदवीधरच्या तीन जागा होत्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना होता. यात महाविकास आघाडीचे उमेदवार तीन ठिकाणी यशस्वी ठरले आहेत. राज्यात सत्ता असून महायुतीच्या पदरात फक्त दोन जागा आल्या. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन आणि काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार उभे केलेले. पण त्यांना कुठेही खातं उघडता आलेलं नाही.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.
महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला
शिक्षक आणि पदवीधरच्या या निवडणुकीत खरी कमाल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसने केली आहे. मराठवाडा आणि पुणे पदवीधरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकली, तर काँग्रेसने नागपूरचा बालेकिल्ला भाजपकडून हिसकावून घेतला. नागपूर हे मुख्यमंत्र्यांच शहर आहे. त्यामुळे तिथली पदवीधरची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय होती. पण काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. त्यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. “शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला” असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.