उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा !  ''या'' प्रकरणी निर्षोद मुक्तता; तब्बल १७ वर्ष..
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा ! ''या'' प्रकरणी निर्षोद मुक्तता; तब्बल १७ वर्ष..
img
Nandini khandare More
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदें यांना एका खटल्या प्रकरणी  मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण न्यायालयात तब्बल १७ वर्षांपासून सुरू असलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा आज निकाल लागला. २००९ च्या कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आलेल्या कथित व्हिडिओ आणि सीडी प्रकरणातून हा खटला सुरू झाला होता. या प्रकरणात उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे आरोपी होते. कल्याण न्यायालयाने आज या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळाला.

२००९ मध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान एका निवडणूक सभेत कथित व्हिडिओ दाखवण्यात आल्याच्या प्रकरणावरून दिवंगत वसंत डावखरे यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयीन खटला सुरू झाला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तक्रारदार पक्षाकडून २० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये पोलिस अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यानंतर सर्व आरोपींची कलम ३१३ अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

ऑगस्ट २०२६ मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात आपले जबाब नोंदवले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले होते. दरम्यान, कथित सीडी, त्यातील एडिटिंग, फॉरेन्सिक अहवाल आणि तपास प्रक्रियेवर बचाव पक्षाने प्रश्न उपस्थित केले होते. आरोपींचा या कथित प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा बचाव पक्षाने न्यायालयात केला. तब्बल १७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर आज कल्याण न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला आणि उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group