राजकारणात शोककळा ! काँग्रेस आमदाराचे दीर्घ आजाराने निधन
राजकारणात शोककळा ! काँग्रेस आमदाराचे दीर्घ आजाराने निधन
img
Nandini khandare More
राजकारणातून एक दुःखदायक बातमी समोर आली आहे.हिमाचल प्रदेशातील रामपुर विधानसभेचे सलग ४ वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंद लाल यांचे आज पहाटे ५:३० वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून राजकारणात शोककळा पसरली आहे. 

७२ वर्षांचे नंद लाल हे गेल्या काही काळापासून किडनी आणि प्रोस्टेटच्या आजाराशी झुंज देत होते. ते अनेक वर्षांपासून डायलिसिसवर होते. शिमला येथील चमियाना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात येण्यापूर्वी नंद लाल यांवी ITBP (भारत-तिबेट सीमा पोलीस) मध्ये कमांडो म्हणून सेवा बजावली होती. तत्कालीन पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या सुरक्षेतही काम केले होते. २००७ मध्ये व्हीआरएस (VRS) घेऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण हिमाचल प्रदेशात आणि त्यांच्या मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

मुख्यमंत्री सुखू यांनी दुःख व्यक्त केले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी नंद लाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी FB पोस्टमध्ये लिहिले, "रामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सातव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नंदलाल यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नंदलाल जी हे आपल्या तत्त्वांवर ठाम राहणारे आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते होते. त्यांचे स्पष्ट विचार करणारे व्यक्तिमत्व नेहमीच स्मरणात राहील. ते आपल्या सार्वजनिक जीवनात समाजासाठी समर्पित राहिले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या कठीण काळात शोकाकुल कुटुंबाला धैर्य व शक्ती देवो. माझ्या मनःपूर्वक संवेदना त्यांच्या शोकाकुल कुटुंबासोबत आहेत. ओम शांती."

नंदलाल चार वेळा आमदार होते नंदलाल हे रामपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी हिमाचल प्रदेश राज्य वित्त आयोगाच्या सातव्या मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. २००७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर २०१२, २०१७ व २०२२ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. नंदलाल यांचा जन्म १६ एप्रिल १९५४ रोजी रामपूर बुशहर जिल्ह्यातील देवथी येथे झाला. त्यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) मध्ये सेवा बजावली. त्यांनी पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) मध्येही सेवा बजावली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group