वैद्यकीय क्षेत्रालाही थक्क करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या पोटात तब्बल तीन वर्षांपासून गर्भाचा सांगाडा असल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे, एवढी वर्षे महिलेला याची कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात तपासणी करण्यात आली आणि डॉक्टरांसमोर धक्कादायक वास्तव आलं. नेमकं काय आहे हे प्रकरण?
पोटातच बाळातं दगड झालं.. हे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील नवल वाटेल. पण महिलेला कळलंच नाही की, ती गरोदर आहे, अखेर पोटात तिव्र वेदना सुरु झाल्यानंतर पोटातच बाळाचं दगड झाल्याचं समोर आलं... जाणून घ्या नेमकं झालं तरी काय...? समोर आलेल्या माहितीनुसार, सोमालीलँडमध्ये एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण समोर आलं आहे, जिथे 42 वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे तीन वर्षांनंतर एक ‘दगडी बाळ’ (स्टोन बेबी) बाहेर काढण्यात आलं.
सोमालीलँडमध्ये राहणाऱ्या महिलेला पोटाच्या खालच्या भागात वेदना होत होत्या. पण तिला त्या वेदना तिला कळून आल्याच नाहीत. साधं दुखणं असल्याचं समजत महिलेने त्याककडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा वेदना तिव्र झाल्या आणि महिला डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड आणि सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर देखील हैराण झाले.
महिलेच्या पोटात एक गर्भाचा सांगाडा असल्याचं समोर आलं. जो कॅल्शियम पूर्णपणे साचल्यामुळे दगडासारखं कडक झालं होतं. ‘इंटरनॅशनल मेडिकल केस रिपोर्ट्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचा हवाला देत ‘लाइव्ह सायन्स’ने ही माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या स्थितीला ‘लिथोपेडियन’ किंवा ‘स्टोन बेबी’ असं देखील म्हणतात. अशी परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा, गर्भाशयात वाढणारं गर्भ पोटात वाढू लागतं आणि याचं कारणांमुळे बाळाचं गर्भातच निधन होतं.’