दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. FDA च्या धडक कारवाईत तब्बल १ हजार ३२९ किलो सुका मेवा आणि विविध खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, नेमकी कुठे आणि कोणत्या पदार्थांवर ही कारवाई करण्यात आली?
पुणे विभागात एफडीएच्या पथकाने एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तब्बल १ हजार ३२९ किलो वजनाचा संशयास्पद खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या कारवाईदरम्यान पथकाने ३५८ किलो बदाम, ४९३ किलो काळे मनुके आणि ४७८ किलो डाळीचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा आणि मानांकनांच्या नियमांचे तसेच पॅकिंगवरील योग्य लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण अन्नसाठ्याची बाजारातील अंदाजे किंमत ६ लाख ५८ हजार २७५ रुपये इतकी आहे. सणाच्या काळात मिठाई आणि सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, याच संधीचा फायदा घेऊन काही व्यापारी निकृष्ट किंवा विनापरवाना माल बाजारात विकण्याची शक्यता असते.
ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता एफडीए प्रशासनाने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. नागरिकांनी सण-सुदीच्या काळात कोणतीही खाद्यपदार्थ किंवा सुकामेवा खरेदी करताना पाकिटावर दिलेली एक्सपायरी डेट (मुदत), उत्पादनाची तारीख आणि बॅच क्रमांक आवर्जून तपासून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तातडीने एफडीएशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दिवाळीत अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार आहेत.
जेव्हा गर्भ खूप मोठा होतो, तेव्हा शरीर त्याचं पुनर्शोषण करू शकत नाही. स्वतःचं रक्षण करण्यासाठी, शरीर मृत गर्भाभोवती कॅल्शियमचा थर साचवू लागते. कालांतराने, तो गर्भ दगडासारखा कठीण बनतो. गेल्या 400 वर्षांत, जगभरात अशा प्रकारची केवळ 330 ते 340 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
डॉक्टरांनी वाचवले महिलेचे प्राण…
महिलेची प्रकृती लक्षात घेत, डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. कठीण ऑपरेशननंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून दगड झालेल्या गर्भाला सुरक्षित बाहेर काढलं. ऑपरेशननंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारना होत असून, तिला रुग्णालयातून घरी देखील सोडण्यात आलं आहे. 6 महिने पूर्ण तपासणी केल्यानंतर महिलेची प्रकृती आता स्थिर असून, तिच्या वेदना नष्ट झाल्यात… तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, ग्रामीण आणि मागास भागांत, वेळेवर सोनोग्राफी आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध नसल्यामुळे, अशा प्रकारची प्रकरणं अनेकदा दीर्घकाळपर्यंत लक्षात येत नाहीत.