न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज इशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. पहिल्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या मांडीजवळील स्नायूंना दुखापत झाली असून, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली असली, तरी इशानच्या अनुपस्थितीमुळे दुसऱ्या सामन्यात संघाच्या फलंदाजीच्या संयोजनात बदल होण्याची शक्यता आहे. आता त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार आणि भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला. दुखापत झाल्यामुळे स्फोटक बॅट्समन ईशान किशन टी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, क्राइस्टचर्च येथे झालेल्या पहिल्या सामान्यादरम्यान ईशानच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे ईशान तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला नाही. त्याच्या जागेवर टिलक वर्माला पाठवण्यात आले. पण तो फक्त सहा धावाच करू शकला. त्यानंतर ईशान पाचव्या क्रमांकावर आला आणि तो फक्त एका धावेवरच बाद झाला.
बीसीसीआयने पुढे असे देखील सांगितले की, ईशान किशन शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी- २० सामन्यातून बाहेर झाला आहे . या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या मांडीच्या स्नायूला किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचसोबत टी- २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम टीम इंडियाने केला. प्रथम बॅटिंग करत न्यूझीलंडने २२५ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग करत हा सामना जिंकला.
या सामन्यात संजू सॅमसनने ६७ धावा केल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. तर त्याच्यापाठोपाठ श्रेयस अय्यरने ४२ धावा आणि नमन धीरने ४२ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामाना २४ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या सामन्यात आता दुखापत झाल्यामुळे ईशान किशन खेळणार नाही. आता त्याच्या जागी वैभव सूर्यवंशी खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.