...तर ''या'' एका चुकीमुळे तुमचंही Whatsapp होवू  शकत बंद, आताच जाणून घ्या
...तर ''या'' एका चुकीमुळे तुमचंही Whatsapp होवू शकत बंद, आताच जाणून घ्या
img
Nandini khandare More

 WhatsApp कडून आपल्या ग्राहकांसाठी दर वेळी वेगवेगळं फीचर्स लॉन्च केले जातात. हे फीचर्स अपडेट करत असताना ग्राहकांच्या फायद्यासोबतच सुरक्षिततेचाही काटेकोरपणे विचार केला जातो. दरम्यानं आत अपुन्हा एकदा व्हाट्स अप कडून आपल्या ग्राहकांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

 महत्त्वाची अपडेट म्हणजे, १ जानेवारी २०२७ पासून SIM Binding नियम लागू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या नियमानुसार ज्या मोबाइल नंबरवरून WhatsApp किंवा इतर मेसेजिंग App वापरलं जातं, त्या नंबरचं सिम कार्ड संबंधित फोनमध्ये असणं आवश्यक असेल. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सध्या अनेकांना यूजर्स WhatsApp वर ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर संबंधित सिम कार्ड फोनमधून काढतात. त्यानंतरही वाय-फाय किंवा दुसऱ्या सिमच्या इंटरनेटच्या मदतीने WhatsApp वापरता येते. पण नव्या SIM Binding नियमानुसार, WhatsApp ज्या नंबरवर सुरू आहे, त्या नंबरचं सिम कार्ड फोनमध्ये असणं बंधनकारक असेल. हा नियम फक्त WhatsApp पुरता मर्यादित नसून टेलिग्राम, सिग्नल, ShareChat, JioChat आणि Arattai यांसारख्या मेसेजिंग Apps नाही लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नियम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश काय? डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालणं हा या नियमामागचा प्रमुख उद्देश आहे. बऱ्याचदा सिम कार्ड एका फोनमध्ये असतं, तर त्याच नंबवरचे मेसेजिंग App दुसऱ्या डिव्हाइसवर वापरलं जातं. अशा परिस्थितीत संशयित डिव्हाइसचा मागोवा घेणं तपास यंत्रणांसाठी कठीण होऊ शकतं. SIM Binding मुळे मोबाइल नंबर आणि संबंधित डिव्हाइस यांच्यातला संबंध जास्त स्पष्ट ठेवायला मदत होईल.

WhatsApp Web वापरणाऱ्यांना दिलासा सुरुवातीच्या निर्देशांमध्ये WhatsApp वेब सेशन दर सहा तासांनी आपोआप लॉगआउट करण्याची अट होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ही अनिवार्य अट मागे घेऊन त्याऐवजी जोखमीवर आधारित यंत्रणा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक यूजरला दर सहा तासांनी लॉगआउट व्हावं लागणार नाही. मात्र, फोनमध्ये संबंधित सिम असण्याची अट कायम राहणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group