लाडक्या बहिणींसाठी एकीएक एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबरची १२ तारीख उजाडली आहे. पण अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. ऑक्टोबर महिनाही आता अर्धा संपत आल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे.
समोर आलेलया माहितीनुसार, सप्टेंबरचा हप्ता दसऱ्यानंतर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा निधी उशीरा झाला, तर आगामी नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सण डोळ्यासमोर ठेवून सरकार दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३,००० रुपये खात्यात जमा करू शकते, अशी चर्चा राज्यातील महिलांमध्ये रंगली आहे.
ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) किंवा आधार-बँक सीडिंग (DBT Active) पूर्ण नाही, त्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रोखले जाऊ शकतात. त्यामुळे शासनाकडून वारंवार कागदपत्रे अद्ययावत करण्याचे आवाहन केले जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा निर्णय सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. १३ तारखेला राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.