मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि काही विद्यार्थी संघटनांनी आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अत्यंत नाट्यमय आणि धडक कारवाई केली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर उतरलेल्या विमानाच्या आत शिरूनच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलिसांच्या आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने विमानातच त्यांच्यावर कारवाई केली असून, त्यांना विमानतळावरूनच अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन देखील तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके याने “अरे सर मी इथे अरेस्ट होण्यासाठीच आलोय”, असे म्हटले.