‘ज्ञानेश कुमार हटाव’चा नारा ! इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा नारा ! इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
img
Nandini khandare More
सध्या देशात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून देशात सध्या मोठा धुमाकूळ निर्माण झाला आहे. दरम्यान आता दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला घेराव घालण्यासाठी लोकशाही वाचवा मोर्चा काढला आहे. विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे कूच करत आहेत. “ज्ञानेश कुमार हटाव” अशी मागणी करत विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या आंदोलनामध्ये वर्षा गायकवाडदेखील सहभागी झाल्या असून त्यांनीही निवडणूक आयोगाला विरोध दर्शवला आहे.

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य नेते या बैठकीत मोर्चाची पुढील रणनीती ठरवत आहेत. ही बैठक संपल्यानंतर खासदार निवडणुकीच्या आयोगाच्या मुख्यालयावर धडक देतील. याआधी काँग्रेस आणि ठाकरे गटाने स्वतंत्रपणे आंदोलने केली होती, मात्र आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी एकत्रितपणे हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group