सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी ! १ ऑक्टोबरपासून ATM ते LPG पर्यंत होणार ‘हे’ ५ मोठे बदल
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी ! १ ऑक्टोबरपासून ATM ते LPG पर्यंत होणार ‘हे’ ५ मोठे बदल
img
Nandini khandare More
सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबरपासून देशभरात काही महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. ATM व्यवहार, LPG सिलिंडर आणि इतर सेवांशी संबंधित या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून नेमके कोणते ५ नियम बदलणार आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.


बँकिंग, डिजिटल पेमेंट, एलपीजी आणि पेन्शनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. यातले बरेच बदल १ ऑक्टोबर २०२६ पासून, तर UPI चे बदल १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या नियमांची माहिती घेणं महत्त्वाचं आहे. 

SBI ATM व्यवहारांची मर्यादा बदलणार SBI च्या सॅलरी पॅकेज ग्राहकांसाठी दुसऱ्या बँकेच्या ATM मधून मिळणाऱ्या मोफत व्यवहारांची संख्या कमी होणार आहे. सध्या उपलब्ध असलेली १० मोफत व्यवहारांची मर्यादा ५ वर येणार आहे. यामध्ये रोख रक्कम काढण्यासोबतच बॅलन्स तपासण्यासारख्या व्यवहारांचाही समावेश असेल. मात्र SBI च्या स्वत:च्या ATM वर सॅलरी पॅकेज ग्राहकांना अमर्यादित मोफत व्यवहारांची सुविधा सुरू राहणार आहे.

बल्क FD च्या व्याजदरांची ऑनलाइन माहिती १ ऑक्टोबरपासून बँकांना बल्क फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांची माहिती प्रत्येक कामकाजाच्या दिवशी ऑनलाइन प्रकाशित करावी लागणार आहे. समान दिवशी बुक केलेल्या समान बल्क डिपॉझिटसाठी साधारणपणे एकसमान व्याजदर लागू होईल. या बदलाचा सामान्य रिटेल FD च्या व्याजदरांवर थेट परिणाम होणार नाही.

२,००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर MDR १५ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI मर्चंट पेमेंटवर MDR लागू होण्याची शक्यता आहे. २,००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क लागू होणार नाही. छोट्या व्यापाऱ्यांसाठी असलेल्या शून्य-MDR व्यवस्थेतल्या व्यवहारही मोफत राहतील.

LPG सब्सिडीसाठी आधार बायोमेट्रिक आवश्यक १ ऑक्टोबरपासून LPG सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण करणं आवश्यक असेल. गॅस एजन्सी, संबंधित मोबाइल अॅप किंवा डिलिव्हरीच्या वेळी ही प्रोसेस पूर्ण करता येऊ शकते. व्हेरिफिकेशन केलं नाही तर सबसिडीच्या १४.२ किलो सिलिंडरचा लाभ मिळणार नाही.

NPS खाते उघडण्यासाठी नवीन शुल्क NPS आणि NPS Lite मध्ये PoP च्या मदतीने खातं उघडणाऱ्या ग्राहकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवीन जॉइनिंग चार्ज लागू होईल. प्रत्येक PRAN साठी २०० रुपये शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे ऑक्टोबरपासून होणारे हे बदल बँक ग्राहक, LPG ग्राहक, UPI युजर्स आणि NPS खातेदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group