आमदाराचा मुलगा झाला बेपत्ता ! बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर गेला पण परतलाच नाही
आमदाराचा मुलगा झाला बेपत्ता ! बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर गेला पण परतलाच नाही
img
Nandini khandare More
बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर गेलेला आमदाराचा मुलगा बेपत्ता झाला असल्याची घाना घडली घडली आहे. त्यामुळे राजकरणात एकचखळबळ निर्माण झाली आहे. 

जम्मू-काश्मीरमधील हिरानगर मतदारसंघाचे भाजप आमदार आणि अधिवक्ता विजय शर्मा यांचा मुलगा आदित्य कुमार बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. घरातून बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडलेला आदित्य घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून कठुआपासून जम्मूपर्यंत विविध ठिकाणी तपास केला जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य शर्मा हिरानगर येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. शाळा सुटल्यानंतर तो घरी परतला होता. त्यानंतर संध्याकाळी खेळण्यासाठी तो हिरानगरमध्ये एका ठिकाणी गेला होता. दिवस उलटून गेल्यानंतरही आदित्य घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानांतर आदित्य कुठेही सापडला नाही.

याप्रकरणी शर्मा कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला दरम्यान, आदित्य संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एका बसमध्ये बसून कुठेतरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या माहितीला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या शक्यतेसह इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

 आदित्यच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. उशिरा रात्री पोलीस कठुआ बसस्थानकावरही पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, एका बसच्या चालक आणि चालकाला चौकशीसाठी सिटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच इतर संभाव्य ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आदित्यच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणतीही सविस्तर अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. आदित्यचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध शक्यता तपासत असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group