नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" भागांत उद्या ६ तास वीजपुरवठा बंद राहणार
img
Nandini khandare More

 नाशिक :- महावितरणच्या पंचक, मुक्तिधाम व देवळाली कॅम्प उच्चदाब वाहिनी तसेच ३३ के.व्ही. सिक्युरिटी प्रेस विद्युत वाहिनीच्या तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पंचक, मुक्तिधाम व देवळाली कॅम्प विद्युत उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे जेल रोड, कैलासजी सोसायटी, भीम नगर, ब्रह्मगिरी सोसायटी, साने गुरुजी नगर, कलानगर, आशा नगर, गंधर्व नगरी, लोकमान्य नगर, मोटवानी रोड तसेच परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे. यासह मुक्तिधाम व देवळाली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील वीजपुरवठा  बंद राहणार आहे.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २  कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group