Nashik : निवृत्त आरटीओ अधिकार्‍याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
Nashik : निवृत्त आरटीओ अधिकार्‍याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
img
Nandini khandare More

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत एका निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन अधिकार्‍याने आत्महत्या केल्याची घटना सिटीसेंटर मॉलजवळील इमारतीत घडली. हेमंत गोंविद हेमाडे असे आत्महत्या केलेल्या निवृत्त अधिकार्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत हेमाडे हे आरटीओ विभागातून निवृत्त झालेले होते. सिटी सेंटर मॉल परिसरात असलेल्या स्वत:च्या घरी ते होते. त्यांनी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराच्या आवाजाने घरातील लोक घाबरले. परिसरातील लोकांनीही घराबाहेर गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घरी पोहोचले. हेमंत हेमाडे यांनी आत्महत्या का केली, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचे समजते.

ज्या खोलीत त्यांनी आत्महत्या केली, त्याची झाडाझडती पोलिसांनी घेतली; मात्र कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.  हेमंत हेमाडे यांनी अचानक आत्महत्येचा निर्णय का घेतला, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. हेमाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पाटील करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group