नाशिकच्या
नाशिकच्या "या" भागात रविवारी वीजपुरवठा बंद राहणार
img
Nandini khandare More
नाशिक : महापारेषणच्या सातपूर १३२ केव्ही विद्युत उपकेंद्रातून निर्गमित होणाऱ्या वाहिनीवर असलेल्या ३३ केव्ही बेळगाव ढगा आणि  खंबाळे  या दोन विद्युत उपकेंद्राचा संपूर्ण वीज पुरवठा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या विविध विद्युत कामासाठी रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

यामध्ये खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील. 
यामध्ये बेळगाव ढगा गाव, संस्कृती हॉटेल, महिरावणी ते त्र्यंबकेश्वर महामार्ग, वासाली गाव व परिसर, जे.के. पावडर व मॉन्टेक्स फायबर ग्लास, पिंपळगाव बहुला गाव व परिसर, जाधव संकुल, केवल पार्क, म्हाडा परिसर, संदीप युनिव्हर्सिटी, महिरावणी गाव व परिसर, पिंपळगाव गरुडेश्वर, खंबाळे गाव, तळेगावअंजनेरी, जातेगाव, तळेगाव, ग्रेप काउंटी, मुळेगाव, दहेगाव, शिवणगाव, गणेशगावनाईक,गणेशगाव त्र्यंबक, पिंपळगाव बहुला या भागाचा समावेश असणार आहे. 

सदर काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा  सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group