ड्रिंक अँड ड्राइव्हचा संशय! गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली दोन भावांचा मृत्यू
ड्रिंक अँड ड्राइव्हचा संशय! गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली दोन भावांचा मृत्यू
img
Nandini khandare More
राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा भर पडली असून एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने चालवलेल्या कारने दोन जणांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेमका हा अपघात कसा घडला? कारचालकाविरोधात काय कारवाई करण्यात आली? जाणून घ्या सविस्तर.

कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. कोल्हापुरात तरुणाने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.  गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह रणजितसिंह पाटील याने दोघांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाजवळ हा थरार घडला. या अपघातात उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group