हृदयद्रावक ! बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
हृदयद्रावक ! बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
img
Nandini khandare More
एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता दीड वर्षांची चिमुकली बोअरवेलमध्ये पडली आणि तिला वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. प्रशासन आणि बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्मती राहुल गावित (रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे. २२ नोव्हेंबरला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जळोली साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती. ही बोअरवेल अंदाजे ४५ ते ५० फूट होती. 

या बोअरवेलच्या खड्ड्यात बालिका अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथकांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.

२३ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाने बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group