मोठी खुशखबर! आता कोणत्याही वयात होता येणार वकील; वयोमर्यादेची अट रद्द
मोठी खुशखबर! आता कोणत्याही वयात होता येणार वकील; वयोमर्यादेची अट रद्द
img
Nandini khandare More
वकील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादेचा अडथळा होता; मात्र आता ही अट रद्द करण्यात आल्याने कोणत्याही वयात वकील होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वयामुळे शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमका हा निर्णय काय आहे आणि कोणाला याचा फायदा होणार? जाणून घेऊया...

 भारतीय बार कौन्सिलने टाकलेली वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. भारतीय बार कौन्सिलने ३ आणि ५ वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमांची वयोमर्यादा मागे घेतली आहे. त्यामुळे आता तुमचे वयाच्या कुठल्याही वर्षी वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. अनेकदा नोकरी करत असताना किंवा निवृत्त झाल्यानंतर अनेकांना वकील होण्याची इच्छा असते. पण भारतीय बार कौन्सिलने वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली होती. पण आता वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना कायद्याचे शिक्षण घेता येणार आहे.

५ नोव्हेंबरला झालेल्या भारतीय बार कौन्सिलच्या सर्वसाधारण परिषदेत वयोमर्यादा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ६ नोव्हेंबरला याची माहिती सुप्रीम कोर्टात सांगण्यात आली. नोकरी करून अनेकांना कायद्याचे शिक्षण घ्यावे लागत होते पण ते पूर्ण करता येत नव्हते, कौटुंबीक अडचणींमुळे अनेकांना वकिलीचे शिक्षण घेता आले नव्हते, निवृत्तीनंतर काहींनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला होता या सर्वाचे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

या निर्मयानंतर आता, विद्यार्थ्यांना बारावीनंतर ५ वर्षांचा एलएलबीचा अभ्यासक्रम आणि पदवीनंतर ३ वर्षांचा एलएलबीचा अभ्यासक्रम करता येतो. या दोन्ही अभ्यासक्रमांना कमाल मर्यादा नसणार आहे. यापूर्वी ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २० वर्षे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी २२ वर्षे वयोमर्यादा होती. त्यासोबत ३ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी देखील वयोमर्यादा होती.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group