राजकारणात मोठी उलथापालथ ! भाजपला सोडचिठ्ठी देत नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारणात मोठी उलथापालथ ! भाजपला सोडचिठ्ठी देत नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
img
Nandini khandare More

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपला धक्का देत काँग्रेसने मोठा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. भाजपमधील बड्या नेत्याने काँग्रेसचा हात धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नेमका हा नेता कोण? आणि या प्रवेशामागचं राजकीय गणित काय? जाणून घेऊया...

 दोनच दिवसांपूर्वी भाजपने पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  आता पुण्यामधून देखील एक मोठी बातमी समोर येत आहे.

आता पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्यातील नेते मयूरसिंह पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपसाठी इंदापूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. मयूरसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी पक्ष संघटनेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच इंदापूर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे, त्यांनी भाजपची साथ सोडून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  यामुळे तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group