विलिनीकरणाच्या चर्चेला सुप्रिया सुळेंचं उत्तर; एका वाक्यात सगळंच स्पष्ट केलं!
विलिनीकरणाच्या चर्चेला सुप्रिया सुळेंचं उत्तर; एका वाक्यात सगळंच स्पष्ट केलं!
img
Nandini khandare More
राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या एका वाक्यातील उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? जाणून घ्या...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चेबाबत मोठं विधान केले. 'अजितदादा गेल्यावर विलिनीकरणाच्या चर्चा संपल्या. विलिनीकरणाला आमच्याकडून आता फूलस्टॉप.', असे म्हणत सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला. त्याचसोबत शरद पवार एनडीएसोबत जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, 'आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.राजकारणात रोज तर्क वितर्क चालत राहणार आहे. राजकीय पक्ष असल्याने चर्चा होतात. अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. अजितदादा गेल्यावर विलिनीकरणाच्या चर्चा संपल्या. ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्यादिवशीच माझ्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपला.'

सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितले की,'माझा भाऊ राहिला नाही आता कसली चर्चा करत आहात. विलिनीकरणाला आमच्याकडून फूलस्टॉप. इथून पुढे विलिनीकरणावर उत्तर देणार नाही. यावर बोलायचा मला आता कंटाळा आला आहे. सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाकडून कुणाचे फोन, मेसेज, पत्र आलेले नाही.' तसंच, 'राज्यात दुष्काळाचा विषय गंभीर आहे त्याकडे लक्ष द्या. देशासमोर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर बोला, असे त्या म्हणाल्या.

शरद पवार आणि प्रफुल पटेल भेटीवर सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, 'राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भेठीगाठी होत असतात. आम्ही सेवेसाठी राजकारणात आलो आहोत. आमच्या बैठका लोकांच्या कामासाठी होत्या. भुजबळ आणि आमचे कौटुंबिक संबंध आहे.भुजबळ ८० वर्षांचे, तटकरे ५० वर्षे राजकारणात, पटेल यांनी साहेबांसोबत काम केले. वयाने आणि अनुभवाने सगळे मोठे आहे. सन्मान बोलावे हे माझे संस्कार आहे. चांगल्या वाईट कळत एकत्र राहिले आहोत. सत्ता येते आणि सत्ता जाते मात्र नाती कायम टिकतात.'
इतर बातम्या
Join Whatsapp Group