शिंदेसेनेला मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे
शिंदेसेनेला मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे
img
Nandini khandare More

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार , परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. नगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नऊ नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पाथरीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षांसह शिवसेना शिंदे गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले होते.

मात्र, आता याच गटातील दोन नगरसेवकांनी वेगळा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आपण राजीनामा देत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ७ ब मधून निवडून आलेले पठाण हसीब खान तहजीब खान आणि आलम तरन्नुम बेगम मुजीब यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचा सदस्य म्हणूनही यापुढे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कथित भ्रष्ट कारभाराला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे पाथरी नगरपालिकेतील सत्ताधारी गटात नाराजी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, राजीनामा दिल्यानंतर हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात पाथरीच्या राजकारणात आणखी काही बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group