राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खांदेपालट! मुंबई अध्यक्षपदी 'या' युवा नेत्यांची वर्णी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खांदेपालट! मुंबई अध्यक्षपदी 'या' युवा नेत्यांची वर्णी
img
Nandini khandare More

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले असून, मुंबई अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी युवा नेते झिशान सिद्दीकी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निर्णयामुळे मुंबईतील राष्ट्रवादीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. आता झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्षाची संघटना किती मजबूत होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झिशान सिद्दिकी आणि उमेश पाटील यांनी नियुक्ती पत्र देण्यात आले.

झिशान सिद्दिकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचं पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी होत ते आमदार झाले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद देखील सांभाळले होते. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण शिवेसेना नेते वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर पाठवले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group