वातावरण तापलं ! प्रदीप पूर्णेकरांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार
वातावरण तापलं ! प्रदीप पूर्णेकरांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार
img
Nandini khandare More
काल  रात्री ठाण्यामध्ये  ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख  प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण राजकरणात एकच खळबळ निर्माण झाली असून  राजकीय वर्चस्व, त्याशिवाय बरेच प्रोजक्ट, त्यातील आर्थिक व्यवहार यातील चढाओढ ही सगळी कारण यामागे असल्याची चर्चा रंगते आहे.दरम्यान आता या प्रकरणावरून ठाण्यात वातावरण तापलं असून  पुर्णेकरांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान,  याप्रकरणी  पोलिसांनी एकाला याप्रकरणी अटकही केली आहे. पोलिसांची आणकी एक टीम आरोपींच्या माघावर आहे आणि लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आता पूर्णेकरांचा मृतदेह पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पण अंत्यसंस्कार न करण्याची कुटुंबांची भूमिका असल्याने सध्या पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी ठाण्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.

आरोपींना अटक होईपर्यंत पूर्णेकरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची कुटुंबाची भूमिका आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी नातेवाईकांची मागणी आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्यांनी हा कट रचला आहे. पूर्णेकरांच्या हत्येची सुपारी दिली आहे. त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group