शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावरून सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावरून सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
img
Nandini khandare More

 शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावरून सध्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झालेली असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकरणावर सध्या कोर्टात सुनावणी सुरु असून विधिमंडळातला एक गट एकनाथ शिंदेंसोबत गेला असला, तरी राजकीय पक्ष मात्र उद्धव ठाकरें कडेच आहे, असा त्यांचा युक्तीवादाचा मुद्दा आहे. दरम्यान आज कोर्टात शिवसेना कोणाची? युक्तीवाद सुरु असताना इथे कल्याणमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला. कल्याण पूर्वेत उद्धव ठाकरे  गटाला मोठा धक्का बसला. युवासेना उपजिल्हाप्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशाचं हे चित्र खूप बोलकं आहे.

कल्याण पूर्वेतील उबाठा गटाला मोठा धक्का देत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत केणे, शाखाप्रमुख संभाजी सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षांतराचा निर्णय घेतला. उपशाखाप्रमुख विनोद चव्हाण, हेमंत जाधव आणि अन्य शिवसैनिकांचाही शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश सोहळा पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शेकडो नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला. आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील उबाठा गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का मानला जात आहे.

सर्वोच्च न्यायालय या खटल्यात काय निकाल देईल? हे आपल्याला माहित नाही. पण 2022 साली शिवसेनेत फूट पडल्यापासून चित्र वेगळं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा वेगाने विस्तार सुरु आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याचा खूप फायदा झाला. अधिकृत शिवसेना आज त्यांच्याकडे असल्याने ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने अधिकृत शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्या कुठलीही निवडणूक नाहीय, तरीही हे पक्ष प्रवेश सुरु आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गट दिवसेंदिवस अजून कमकुवत होत चालला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group