महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मंडळाकडून २०२७ मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही परीक्षेच्या नियोजनासाठी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. परीक्षा कधी संपणार, प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक काय आणि सविस्तर वेळापत्रक कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर केली आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक:
इ. १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षा:
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७.
लेखी परीक्षा: सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७.
इ. १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षा:
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन:
गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७.
लेखी परीक्षा: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७.