बळीराजाला दिलासा! 5 हजार रुपयांनंतर सरकारचा दिवाळीत आणखी एक मोठा निर्णय
बळीराजाला दिलासा! 5 हजार रुपयांनंतर सरकारचा दिवाळीत आणखी एक मोठा निर्णय
img
Nandini khandare More
दिवाळीच्या सणात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आधीच 5 हजार रुपयांची मदत जाहीर झाल्यानंतर आता सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. नेमकी ही घोषणा काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार? जाणून घेऊया सविस्तर...

यंदा एल निनोने मान्सूनचा खेळ बिघडवला, जुनचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण जुलै महिना चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर एल निनोचं सावट अधिक गडत होत गेलं आणि पाऊसच झाला नाही, संपूर्ण पावसाळा कोरडला गेला. ऑगस्ट, सप्टेंबर अन् ऑक्टोबर महिन्यात पावसाने दडी मारली. पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम तर हातचा गेला, मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला देखील पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडले. यंदा शेतीत उत्पन्नच न निघाल्याने आता जगायचं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अन्न-धान्य टंचाईसोबतच जनावरांच्या चाऱ्याची देखील भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे.

दरम्यान निराश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वीच सरकारने आग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपयांची घोषणा केली होती. राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या पैशांमुळे थोडा का होत नाही, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान त्यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत 116 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या निधीचं वितरण करण्यात आलं आहे. या निधीमुळे रखडलेल्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या कामांमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना, शेतमजूंना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवच काम मिळणार आहे. त्यामुळे काही अंशी दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतराला देखील अळा बसू शकतो. कुशल अनुदानाअभावी रखडलेल्या कामांना 116  कोटींच्या निधीमुळे चालना मिळणार आहे.  ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे, अशी माहिती यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. दरम्यान या कामांमुळे स्थानिक पातळीवर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group