नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय पक्षांकडून नावांची निश्चिती करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपच्या वाट्याला सहा जागा, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वाट्याला प्रत्येकी दोन जागा आल्या आहेत. त्यानुसार संबंधित पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दोन नावे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी हेमंत गायकवाड आणि बाबा गायकवाड यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेकडून या दोघांना संधी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून चंद्रकांत लवटे आणि बाबुराव आढाव यांची नावे स्वीकृत नगरसेवकपदासाठी पुढे करण्यात आली आहेत.
भाजपच्या सहा उमेदवारांची यादी
भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांचा समावेश आहे.
पक्षनिहाय संपूर्ण यादी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
हेमंत गायकवाड
बाबा गायकवाड
शिवसेना (एकनाथ शिंदे)
चंद्रकांत लवटे
बाबुराव आढाव
भारतीय जनता पक्ष
अजित चव्हाण
हेमंत धात्रक
संदीप लेनकर
रोहिणी नायडू
रामहरी सभेराव
चंद्रशेखर पंचाक्षरी
अशा प्रकारे भाजपचे सहा आणि दोन्ही शिवसेना गटांचे प्रत्येकी दोन उमेदवार अशी एकूण दहा नावे समोर आली आहेत. आता या नावांवर अधिकृत नियुक्तीची प्रक्रिया कधी पूर्ण होते, याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.