शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकरणात मोठ्या घडामोडी सुरु असून आता अमरावती शिक्षक मतदारसंघतुन मोठी पडत समोर आली आहे.या निकालात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली आणि कोण आघाडीवर आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. पाहा, पहिल्या फेरीचा निकाल नेमका काय आहे.
महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीत १,६९४ मतांची मजबूत आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस उमेदवार आदिती पोहरे थेट चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. पहिल्या फेरीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी दुसरे स्थान मिळवले आहे, तर अपक्ष उमेदवार सुरेश देवकर यांनी अनपेक्षित मुसंडी मारत तिसरे स्थान पटकावले आहे.
पहिल्या फेरीची अधिकृत आकडेवारी:
किरण सरनाईक (महायुती): ३,९०३ मते (आघाडीवर)
श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर): २,२०९ मते
सुरेश देवकर (अपक्ष): १,५८२ मते
आदिती पोहरे (काँग्रेस): १,३१९ मते
दत्तात्रय लहाने (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे): १,१६९ मते
संगीता शिंदे (भाजप बंडखोर): ६९८ मते
शेखर भोयर (भाजप बंडखोर): ४३२ मते
२९५ मते ठरली बाद या मतमोजणीदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पहिल्याच फेरीत तब्बल २९५ मते अवैध (बाद) ठरली आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीलाच किरण सरनाईक यांनी घेतलेली मोठी आघाडी पाहता महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील चुरस पाहता पुढील फेऱ्यांमध्ये काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.