एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. एका भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीचा चक्काचूर झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी जवळ घडली आहे. मृतात तीन बालकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मालदाभाडीजवळ भीषण अपघात घडला आहे. येथे एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दूचाकीवर बसलेले सहा जणांचे कुटुंब जबर जखमी झाले.
या तीन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातात ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील लोक आहेत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एक संपूर्ण कुटुंबच नष्ट झाले आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशातील बराणपूर येथील रहिवासी आहे.