बहिणीचे प्रेमसंबंध; भावाचा राग अनावर ! त्र्यंबकेश्वरमध्ये घडलं भयानक
बहिणीचे प्रेमसंबंध; भावाचा राग अनावर ! त्र्यंबकेश्वरमध्ये घडलं भयानक
img
Nandini khandare More
शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबधातून एक अत्यंत भयंकर अशी घटना घडली आहे.नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्यन सोमनाथ कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तिच्या भावाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे (वय २०) याला अटक केली आहे. 

बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे घडली आहे. आर्यन सोमनाथ कांबळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कांबळे याचे संशयित आरोपी आदित्य मोंढे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग आदित्यच्या मनात होता. याच कारणावरून त्याने आर्यनला भेटण्यासाठी बोलावलं. सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ दोघांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात वाद झाला.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित आरोपी आदित्यने आर्यनवर चाकूने हल्ला केला. त्याच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर आणि हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बहिणीच्या प्रेमसंबंधातून भावानेच तरुणाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

या खळबळजनक घटनेनंतर मृत आर्यनच्या कुटुंबीयांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मयत आर्यनचे नातेवाईक रोशन पप्पू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आरोपी आदित्य मोंढे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group