गोदातीरी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रामकुंडावर धार्मिक विधींना सुरुवात
गोदातीरी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रामकुंडावर धार्मिक विधींना सुरुवात
img
Nandini khandare More
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत गोदावरी नदीच्या पवित्र रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संत-महंत, साधू-महंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गोदातीरी पार पडणाऱ्या या धार्मिक सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२:०२ वाजता 'महाध्वजारोहण' संपन्न होईल. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिक येथील रामकुंडावर दाखल झाल्या असून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत यज्ञाला सुरुवात झाली असून या नंतर त्या गोदावरी पूजन करतील.या शुभप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group