भारतीय जनता पक्षाकडून युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले हे तीन नेते नेमके कोण आहेत? त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आली आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
भाजपने युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. सात तरुण नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आणि इतर तिघांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि वडोदराचे खासदार हेमांग जोशी यांनी पक्षाच्या युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये महाराष्ट्रातील ३ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी मंगळवारी जारी करण्यात आली. महाराष्ट्रातील तिघांचा भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सायली कुलकर्णी यांची भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. सोबतच, महाराष्ट्रातील सांगलीतील वीरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि मुंबईतील गुरदित सिंह वोहरा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतील नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या सायली रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला पक्षाच्या राष्ट्रीय संघटनात्मक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील युवा नेत्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. यामध्ये सांगलीतील वीरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि मुंबईतील गुरदित सिंह वोहरा यांचीही नावे आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये विविध राज्यांतील युवा नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव तसेच माध्यम आणि सोशल मीडिया विभागांसाठीही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सात नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे आमदार शगुन परिहार आणि बंगालचे आमदार सौमेन कर्फा यांचा समावेश आहे. इतर नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे निखिल मणी तिवारी, नागालँडचे अरविंद दमानी, तेलंगणाचे मलोथ कोमाली नाईक, बिहारचे राजेंद्र सिंह आणि छत्तीसगडचे भूपेंद्र नाग यांचा समावेश आहे. भाजपने बिहारच्या आमदार आणि प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांची युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यासोबत विविध राज्यांतील ३३ जणांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.