भारताला पुन्हा अमेरिकेचा दणका बसणार? भारतासह 27 देशांचं टेन्शन वाढलं; ट्रम्प पुन्हा टॅरिफचा दणका देण्याच्या तयारीत
भारताला पुन्हा अमेरिकेचा दणका बसणार? भारतासह 27 देशांचं टेन्शन वाढलं; ट्रम्प पुन्हा टॅरिफचा दणका देण्याच्या तयारीत
img
Nandini khandare More
जागतिक राजकारण आणि व्यापार क्षेत्रातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेने भारतासह अनेक प्रमुख व्यापारी भागीदारांच्या औद्योगिक उत्पादन क्षमतेबाबत तपास सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. या तपासानंतर संबंधित देशांवर नव्याने आयात शुल्क लादले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारताच्या व्यापारावर आणि अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होणार? ट्रम्प यांचा नेमका प्लॅन काय आहे? जाणून घेऊया सविस्तर.

 भारत चीन, युरोप यांच्यासह 16 देशांवर आयात शुल्क टॅरिफ वाढवण्याची तयारी करत आहे. येणाऱ्या काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधि कार्यालयाकडून या 16 देशांमध्ये उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाबाबत अनेक महिन्यांपासून तपास सुरू होता. या तपासाचा निष्कर्ष लवकरच जाहीर केला जाऊ शकतो.

ट्रम्प सरकारने हा निर्णय यापूर्वी लागू केलेल्या व्यापक आयात शुल्कांच्या जागी नवीन शुल्क लागू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते. मात्र, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारीमध्ये हे शुल्क असंवैधानिक ठरवत रद्द केले होते.

व्हाइट हाऊसच्या म्हणण्यानुसार, संबंधित देशांमध्ये उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानामुळे उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होत आहे. परिणामी, बाजारात कमी किमतीच्या उत्पादनांचा पुरवठा वाढत असून अमेरिकन कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची तयारी सुरू आहे.

प्रस्तावित टॅरिफचा दर अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, यंदाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या १० ते १२.५ टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त हे नवीन शुल्क लागू केले जाण्याची शक्यता आहे. चीनसह अनेक देशांनी यापूर्वीच अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी लागू केलेल्या तात्पुरत्या आयात शुल्कांची मुदत संपत असतानाच अमेरिकेकडून नव्या शुल्कांची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनसह इतर प्रमुख व्यापारी भागीदारांमधील व्यापार संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Nashik : FDA ची

Join Whatsapp Group