सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. सोन्याच्या किमतीत तब्बल १,४८० रुपयांची वाढ झाल्याने सराफा बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. मग आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव किती आहे?
आठवडाभरापूर्वी सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने खरेदीदारांची चिंता वाढली आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आजच्या बाजारभावानुसार, सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १ हजार ४८० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५६० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या बाजारातही गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या १०० ग्रॅम चांदीचा भाव १७ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. एकूणच, सोन्याच्या दरातील वाढ आणि चांदीचे स्थिर भाव यामुळे सराफा बाजारातील पुढील घडामोडींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today) १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५६ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०१,२४८ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२६,५६० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५,६००
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today) १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०० ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,८०० १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,००० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०,०००
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today) १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९१ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,९२८ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,९१० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९,१००