लक्ष्मीपूजनानंतर सराफ बाजारात मोठा उलटफेर ! वाचा आजचा दर काय ?
लक्ष्मीपूजनानंतर सराफ बाजारात मोठा उलटफेर ! वाचा आजचा दर काय ?
img
Nandini khandare More
दिवाळीचा सण संपताच सराफ बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे खरेदीदारांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मग आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती झाले? १० ग्रॅम सोन्यासाठी आता किती रुपये मोजावे लागणार? जाणून घेऊया सविस्तर...

काल दिवसभर सोन्या आणि चांदीचे दर स्थिर होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा होता. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा सोन्या आणि चांदीचा दरात मोठी वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 47 हजार 805 रुपयांवर पोहोचला आहे.तसेच दुसरीकडे चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. त्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 96 हजार 730 रुपये झाले आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group