समुद्रात घोंघावतंय शक्तिशाली चक्रीवादळ ! २८ ऑक्टोबरला धडकण्याची शक्यता, शाळांना सुट्टी जाहीर
समुद्रात घोंघावतंय शक्तिशाली चक्रीवादळ ! २८ ऑक्टोबरला धडकण्याची शक्यता, शाळांना सुट्टी जाहीर
img
Nandini khandare More
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या संभाव्य चक्रीवादळामुळे अनेक भागांत हवामान बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या वादळामुळे ताशी १४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागांत मुसळधार पाऊसही पडू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हे चक्रीवादळ नेमके कुठे धडकणार, कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे आणि शाळांना किती दिवस सुट्टी असणार? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

. हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान वादळाचा वेग हा 115 ते 125 किलोमीटर असू शकतो, ज्यामुळे हे वारे थैमान घालू शकते, असा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग हा ताशी 140 च्या पुढे जाण्याचीही शक्यता आहे. किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला. तब्बल 10 हून अधिक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये उद्या सकाळपासूनच पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच दक्षता म्हणून या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

ओडिसातील पाच जिल्ह्यांना याचा मोठा धोका आहे. यादरम्यानच प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्र यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुद्दुचेरीमधील स्थिती अधिक गंभीर आहे. समुद्रातही सतर्कता वाढवण्यात आली. तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरातील नऊ बंदरांवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून अलर्ट जारी करण्यात आला.

महाराष्ट्रातील काही भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व-मध्य आणि त्याला लागून असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. 24 ऑक्टोबरला अधिक तीव्र होऊन ‘प्रेशनमध्ये रूपांतरित झाले. हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असून, त्याचे रूपांतर प्रथम डीप डिप्रेशनमध्ये झाले. ज्यामुळे मोठे वादळ येईल.

चक्रीवादळासह जोरदार पाऊस यादरम्यान होईल. राज्यात यंदा प्रचंड मोठा दुष्काळ आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. राज्यातून मॉन्सून गेला असला तरीही अनेक हवामान तज्ज्ञांकडून पावसाचा इशारा दिला जात आहे. त्यातच आता या चक्रीवादळामुळे पाऊस येणारअ असून जोराने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group