राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यात या प्रक्रियेला मुदत वाढ जाहीर केली आहे. यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयीची माहिती दिली आहे. ज्या नागरिकांची नावं प्रारुप मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. नावांमध्ये चूक झाल्यास, स्पेलिंगमध्ये बदल असल्यास, दुरुस्ती करायची असल्यास अशा नागरिकांना या मुदतवाढीचा मोठा फायदा होणार आहे. सर्व नागरिकांना आता 26 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येतील. संबंधित निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून हरकती नोंदवता येतील.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
एसआयआर प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची पोस्ट
मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी 26 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ
प्रारूप यादीतून नाव वगळलेल्या व नावातील चूक दुरुस्तीसाठी संधी
दावे व हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत संधी
10 नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली निघणार
16 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
पात्र मतदारांना अर्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
16 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी
मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार 26 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांकडून जे दावे, हरकती येतील त्याची प्रशासनाकडून छाननी करण्यात येतील. 10 नोव्हेंबरपर्यंत या सर्व अर्जांचा निपटारा करण्यात येईल. त्यानंतर आवश्यक सुधारणांसह 16 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. एसआयआर प्रक्रियेत नाव वगळण्यात आले असेल. नावात बदल असेल तर तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मतदारांनी अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.